कन्हैया ॲग्रो मध्ये आपले स्वागत आहे...

पशुखाद्य उत्पादनामधील काही प्रमुख उत्पादकांमध्ये 'कन्हैया ॲग्रो' 2017 पासून कार्यरत आहे.
तुमच्या पशुधनाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळा आणि तितकाच पौष्टिक व पोषणयुक्त आहार गरजेचा असल्याची जाण 'कन्हैया ॲग्रो' ला आहे.
त्यामुळेच 'कन्हैया ॲग्रो' ने सखोल संशोधनानंतर तुमच्या पशुंसाठी योग्य व सकस आहार तयार केला आहे.

...

पशुखाद्य उत्पादनातील अग्रेसर कंपनी

...

तुमच्या पशुखाद्यांच्या गरजांची आम्हाला जाण

...

योग्य संशोधनानंतर पशुखाद्यामध्ये पोषणाची अधिकची भर

'कन्हैया ॲग्रो' ची ओळख

अहमदनगरस्थित कन्हैया ॲग्रो 2017 पासून पशुखाद्य बनवणाऱ्या प्रमुख उत्पादक कंपन्यांपैकी एक असून येथे दररोज 540 मेट्रिक टन पशुखाद्य तयार केले जाते. उत्कृष्ट व पौष्टिक पोषणयुक्त पशु आहार बनवला जावा यासाठी अत्यंत मेहनतीने या पशु खाद्यातील पौष्टिक घटकांचा अभ्यास केला गेला आहे. त्यातूनच या पशु आहाराची निर्मिती झाली असून त्याच्या वापरामुळे पशूंचे आरोग्य तर उत्तम राहतेच, पण सोबतीला त्यांच्यापासून मिळणारी उत्पादने देखील उत्तम दर्जाची मिळतात.

गुणवत्तेची हमी

उत्तम वितरण

गोदाम

अधिक माहिती

खरेदी

'कन्हैया ॲग्रो' प्रमुख पशुखाद्य उत्पादकांपैकी एक असल्याने आम्ही उत्पादक, शेतकरी, व्यापारी, दलाल, इत्यादींकडून नियमितपणे कच्चा माल खरेदी करतो. कन्हैया ॲग्रो चा खरेदी विभाग योग्य गुणवत्ता, किंमत आणि सेवा देणाऱ्या पुरवठादारांना ओळखतो व त्यांनाच संधी देतो. आम्ही आमचे पुरवठादार नेहमीच फार काळजीपूर्वक निवडतो. कारण आम्हाला कन्हैया ॲग्रो परिवारामध्ये अशीच माणसं जोडायची आहेत जे उत्तम गुणवत्ता व सचोटीसाठी आमच्याशी कटिबद्ध असतील.

विक्रेता नोंदणी