'कन्हैया ॲग्रो' ची ओळख
आम्हाला म्हणजेच 'कन्हैया ॲग्रो' परिवाराला कायमच वाटते कि, ' 'कन्हैया ॲग्रो' चे खरे यश हे त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटकाच्या प्रगतीमध्ये आहे. 'कन्हैया ॲग्रो' चे ग्राहक, पुरवठादार, व्यावसायिक भागीदार आणि एकूणच सगळ्यांची प्रगती हेच 'कन्हैया ॲग्रो' चे खरे यश आहे. '
'कन्हैया ॲग्रो' चे दैनंदिन कामकाज हे सामानतेच्या तत्वावर चालणारे आहे. आमच्या सचोटी आणि पारदर्शकतेच्या जोरावरचं आम्ही ग्राहकांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळावा यासाठी त्यांना उत्तम पशु आहाराच्या विविध श्रेणी उपलब्ध करून देतो.
गुणवत्तेची हमी
अगदी कच्च्या मालाच्या खरेदीपासून ते उत्पादन तयार होऊन ते ग्राहकाला पाठवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर 'कन्हैया ॲग्रो' त्यांच्या आधुनिक व अद्यावत प्लांटमध्ये अभ्यास व संशोधन करून उत्तम दर्जाचे पशुखाद्य तयार करतो.
उच्च वितरण क्षमता
सर्वोत्तम तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे आणि कच्चा माल मिळवण्याच्या प्रक्रियेसह, 'कन्हैय्या ॲग्रो' कडे पशुधनाच्या खाद्याच्या गुणवत्ते इतकीच उत्तम व सक्षम वितरण क्षमता देखील आहे.
गोदाम
उत्पादने ग्राहकांना पाठवली जाईपर्यंत ती योग्य व सुरक्षितपणे साठवण्यासाठी आमच्याकडे प्रशस्त, उच्च क्षमतेचे गोदाम आहे. आमचे हे गोदाम तापमान नियंत्रण प्रणालीसह सुसज्ज असून याठिकाणी पशुखाद्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी अगदी योग्य वातावरण असते.